top of page

गणेश विद्यालय - प्राथमिक शाळा     

वेळ १२:३० ते ०५:५०

सोमवार ते शनिवार*

कै.सौ. आशाताई  भानुशाली- माध्यमिक शाळा

वेळ १२:३० ते ५.४५

सोमवार ते शनिवार*

शाळेच्या बातम्या व कार्यक्रम 

शाळेचा निकाल

मार्च २०२१ मध्ये झालेल्या इयत्ता १० वी च्या परीक्षेत

शाळेचा एकूण निकाल १००%लागला असून
१) प्रथम -तनिशा भोईर - ४३८/५००, ८७.६०%
२) दुसरा -पूजा भोवड - ४२८/५००, ८५.६०%
३)तिसरा- दीप्ती पवार -४२१/५००,  ८४.२०%
४)चौथा -जागृती आंबेकर - ४११/५००, ८२.२०%
५) पाचवा -परेश म्हात्रे - ४०३/५००, ८०.६०%
🌹🌹🌹सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन🌹🌹🌹
!!! संस्थेचे अध्यक्ष श्री पाटील सर,सर्व पदाधिकारी, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेकडून

खूप खूप अभिनंदन!!!

 

 

WhatsApp Image 2021-09-04 at 21.45.56.jpeg

शाळेचा निकाल

मार्च 2020 मध्ये झालेल्या मा. शा. परीक्षेत शाळेचा निकाल 100 टक्के लागला असून 
1)प्रथम-शैलेश सोनाळे-४५९/५०० टक्के -९१.८०
2)दुसरा -रोशन गोर्डे- ४३०/५००
  ;टक्के-८६.००
3) तिसरा- ऋतुजा शिंदे-४२१/५००
टक्के-८४.२०
4) चौथा - लावण्या भोईर-४१९/५००
  टक्के -८३.८०
5) पाचवा- गायत्री सपाट-३८८/५००
  टक्के -७७.६०
🌹🌹🌹 सर्व यशस्वी विद्यार्थ्यां
चे खूप खूप अभिनंदन🌹🌹🌹
  संस्थेचे अध्यक्ष, श्री,पाटील सर,सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेकडून खुप खुप अभिनंदन

 

 

WhatsApp Image 2020-08-21 at 18.16.00.jp
शाळेची प्रवेश प्रक्रिया

 

आपल्या शाळेची प्रवेश प्रक्रिया साधारणपणे फेब्रुवारी, मार्च पासून सुरू होत असून यावर्षी कोरोना विषाणूमुळे शाळा बंद कराव्या लागल्या,शाळा कधी सुरू होणार हे निश्चित नसल्यामुळे पालकांना आपल्या पाल्याची प्रवेशाची चिंता असणे स्वाभाविक आहे,यासाठी शाळेने ऑनलाइन प्रवेश अर्ज उपलब्ध करून दिलेले आहे.या अर्जाद्वारे आमच्या कै सौ आशाताई भानुशाली माध्यमिक विद्यालय व गणेश विद्यालय या शाळेमध्ये ऑनलाइन प्रवेश अर्ज भरून प्रवेश घेता येईल, शाळेचे कार्यालय सुरू झाल्यानंतर अर्जानुसार पालकांशी संपर्क साधला जाईल. प्रवेश अर्जासाठी लिंक देत आहोत ती लिंक भरून प्रवेश अर्ज सबमिट करावा ही विनंती.


https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdhcCN_buQtmpfBHkw8ohYu_URt9vmHhLAqOlSrkAPx60_R1g/viewform


 श्री .दिलीप पाटील (मुख्याध्यापक)
     9594950833
  सौ.श्रेया बागवे (मुख्याध्यापिका)
    9594969845

 

 

IMG_20191218_155442-compressor.jpg
स्काऊट-गाईड शिबीर

 

बुधवार दिनांक १८-१२-२०१९ रोजी कै. सौ.आशाताई भानुशाली माध्यमिक विद्यालय, डोंबिवली (प) या शाळेचे एक दिवसीय स्काऊट-गाईड शिबिर  'सोशल सर्विस लीग हायस्कूल कॅम्पिंग सेंटर, अतिरिक्त एम.आय. डी. सी.आनंदनगर, अंबरनाथ(पूर्व) येथे आयोजित करण्यात आले होते.शिबिरात विद्यार्थ्यांना स्ट्रेचर,गाठी,तंबू कसे  बांधायचे हे शिकवण्यात आले.
     अंबरनाथ येथील अग्निशमन केंद्रास भेट देऊन उप अग्निशमन अधिकारी श्री. सुतार यांनी विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन विषयी सविस्तर माहिती सांगितली.आग म्हणजे काय?आगीचे प्रकार ,ती कशाप्रकारे विझवली जाते,आग लागल्यानंतर कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे,याविषयी प्रात्यक्षिक सह माहिती देण्यात आली.विद्यार्थ्यांनी आग विझविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नवीन शिडीचा शिडीमध्ये बसून आनंद लुटला.नंतर मुख्य अग्निशमन अधिकारी श्री.नलावडे साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले.शेवटी शाळेचे मुख्याध्यापक श्री. पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन विषयी माहिती दिल्याबद्दल अग्निशमन अधिकारी व त्यांच्या संपूर्ण युनिट (टीम) चे आभार व्यक्त केले.तसेच सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे सुध्दा शिबीर यशस्वी रीत्या पार पाडल्यामुळे आभार व्यक्त केले.
       नंतर पार्ले बिस्कीट कंपनीला भेट देऊन बिस्किटे कशी तयार होतात,त्यांचे पॅकिंग कसे केले जाते,त्याची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली.
        संध्याकाळी परतीच्या प्रवासात अंबरनाथ येथील पुरातन शिवमंदिरास भेट देऊन डोंबिवली येथे रात्री ९.१५ वाजता आगमन झाले.

 

शिबीरचे फोटो 

 

 


स्पिक वेल इंग्लिश ऍकेडेमि इंग्लिश टेस्ट

 

Speakwell English Academy तर्फे घेण्यात आलेल्या इंग्लिश टेस्ट मध्ये सदर शाळेतील खालील विद्यार्थ्यांनी आपले प्रावीण्य दाखवून यश संपादन केले.त्याबद्दल त्यांचे संस्थेतर्फे व शाळेतर्फे अभिनंदन करण्यात आले.
१) प्रथम क्रमांक--
     यदुल विष्णू पांचाळ- इ. १० वी
२) द्वितीय क्रमांक--
     साहिल संजय गमरे- इ. १० वी
३) तृतीय क्रमांक--
     आर्यन जयेश नाचरे- इ. ८ वी

IMG-20200108-WA0045.jpg
IMG-20200104-WA0079.jpg
विज्ञान प्रदर्शन २०१९-२०

 

मंगळवार दिनांक २४-१२-२०१९ रोजी शाळेत विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.विद्यार्थ्यांनी  निरनिराळ्या विषयावर प्रकल्प सादर केले.विद्यार्थी प्रकल्पविषयी माहिती देत होते.

 

वार्षिक स्नेहसंमेलन २०१९-२०

 

''साई संस्था, डोंबिवली शाळांचे स्नेहसंमेलन उत्साहात''

         डोंबिवली येथील साई संस्थेचे मराठी,गुजराती व इंग्रजी माध्यमाचे वार्षिक स्नेहसंमेलन ५फेब्रुवारी २०२० रोजी मोठया उत्साहात पार पडले,
     स्नेहसंमेलनाची सुरुवात 'ओमकार स्वरूपा' या ईशस्तवनाने झाली.या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी नृत्य, लावणी,कोळीगीते यासारखी व इतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.संमेलनास सिनेक्षेत्रातील अभिनेते श्री.दत्ता मोरे, अभिनेत्री सौ.केतकी पालव, उद्योगक्षेत्रातील उद्योजिका व आर पी जी  ग्रुपच्या संचालिका व शाळेची माजी विद्यार्थीनी  सौ.राजश्री गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
      अभिनेते श्री. दत्ता मोरे व सौ.केतकी पालव यांनी शाळांची प्रगती पाहून साऱ्यांचे कौतुक केले.सौ.राजश्री गायकवाड यांनी साई संस्थेत कसे घडलो,याविषयी आपल्या आठवणी सांगितल्या.प्रसिध्द वकील  श्री. रत्नदीप पाटील यांनी मुलांचे भवितव्य योग्य व्यक्तीच्या हातात गेले आहे असे सांगितले. कारण आम्ही श्री. नरसू पाटील सरांमुळे घडलो आहे. अध्यक्षीय भाषणात संस्था अध्यक्ष श्री. नरसू पाटील सरांनी मुलांनी मोठी स्वप्ने पहावीत असे सांगितले. 
        इंग्रजी माध्यामाचा इयत्ता १० वी चा निकाल सतत ७ वर्षे १००टक्के लागत आहे.तर मराठी माध्यमाचा निकाल ८० टक्के च्या वर लागत आहे.
        सदर संमेलनास महाराष्ट्रातील थोर शिक्षण तज्ञ श्री. अमोल ढमढेरे सर,संस्था अध्यक्ष श्री. नरसू पाटील सर,  सचिव श्री. ब्रह्मानंद पाटील, खजिनदार सौ.पद्मिनी पाटील,विश्वस्त डॉ. प्रणाली पाटील, श्री. मिलिंद ठाकूर,तसेच श्री. जगदीश मढवी, श्री. अंकुश जोगळे, श्री. शशिकांत कांबळे, संकेत शेट्ये,  इंद्रजीत, सौ.कमलावती तांडेल,अभिनेता सिद्धेश नलावडे, शाळेचे माजी विद्यार्थी आदि मान्यवर उपस्थित होते. तसेच शाळांचे मुख्याध्यापक श्री. दिलीप पाटील, श्री. संदीप पिळणकर,मुख्याध्यापिका सौ.श्रेया बागवे, सौ.संगीता पासड, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूपच मेहनत घेतली.
     संमेलनाचे सूत्रसंचालन श्री.नंदकुमार वाढविंदे, प्रस्ताविक सौ.श्रेया बागवे, तर आभार प्रदर्शन श्री. संदीप पिळणकर यांनी केले.

 

WhatsApp Image 2020-03-29 at 13.34.41 (1
IMG-20200103-WA0028.jpg
पुढील कार्यक्रम

 

गणेश विद्यालय 

(प्राथमिक शाळा )    

कै.सौ. आशाताई  भानुशाली

(माध्यमिक शाळा)

०५-०६-२०१९

जागतिक पर्यावरण दिन

१४-११-२०१९

पं. नेहरू जयंती

१२-०७-२०१९

आषाढी एकादशी

१९-११-२०१९

इंदिरा गांधी जयंती

१६-०७-२०१९

गुरुपौर्णिमा 

२६-११-२०१९

संविधान दिन

 

३१-०७-२०१९

दीप पूजा 

६-१२-२०१९

महापरिनिर्वाण दिन

०१-०८-२०१९ 

लोकमान्य टिळक पुण्यतिथी 

६-१२-२०१९ ते  ७-१२-२०१९

शालेय सामने

०५-०८-२०१९

श्रावणी सोमवार 

२ रा आठवडा डिसेंबर

विज्ञान प्रदर्शन

३०-०८-२०१९ 

मातृदिन 

३-१-२०२०

सावित्रीबाई फुले जयंती

३-१-२०२०

महात्मा गांधी जयंती

३-१-२०२०

सावित्रीबाई फुले जयंती

०६-१२-२०१९ 

भारत रत्ना डॉक्टर

आंबेडकर महापरिनिर्वाण  दिन 

३०-१-२०२०

महात्मा गांधी पुण्यतिथि

१५-०१-२०२०

मकरसंक्रांती

 ४थाआठवडा जानेवारी

वार्षिक स्नेहसंमेलन

२६-०१-२०२०

प्रजासत्ता दिन 

२७-२-२०२०

जागतिक मराठी भाषा दिन

१४-०४-२०२०

भारत रत्ना डॉक्टर

आंबेडकर जयंती 

२८-२-२०२०

राष्ट्रीय विज्ञान दिन

bottom of page