
विद्यार्थ्यांचे जीवन

वार्षिक अहवाल :
दरवर्षी शाळेत निरनिराळे कार्यक्रम , उपक्रम राबवले जातात. प्रदर्शने आयोजित केले जातात. तसेच थोर पुरुषांच्या जयंत्या , पुण्यतिथि , निरनिराळ्या स्पर्धा आयोजित करून साजरे केले जातात. तसेच प्रभात फेर्या काढल्या जातात. तसेच आंतर शालेय स्पर्धांना विद्यार्थ्यांना पाठवले जातात.
इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांना पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस ,इयत्ता १० वी च्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेस ,तर इयत्ता ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांना भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेस बसवले जातात. आजपर्यंत अनेक विद्यार्थी डॉक्टर ,इंजिनियर ,मॅनेजर ,सी. ए. झाले. तर काही विद्यार्थ्यानी स्वत:चा बांधकाम व्यवसाय सुरू केला.

स्काऊट-गाईड :
दरवर्षी स्काऊट गाईड शिबिरे आयोजित केले जातात. शिबिरात विद्यार्थ्यांना नियम समजावून संगितले जातात.
दोरगाठी, सांकेतिक चिन्हे व खुणा,शिस्त, तसेच त्याविषयी प्रात्यक्षिके,गणवेशाची माहिती,एकत्रित येणे,राहणे,
नियोजन, प्रवासामध्ये वस्तूंची काळजी कशी घ्यायची, याविषयी माहिती दिली जाते. तसेच जवळ एखादा कारखाना
असेल तर कारखान्याला भेट दिली जाते .
सह-शालेय उपक्रम :
विद्यार्थ्यांचा सह-शालेय उपक्रमात सहभाग. उदा. निबंध स्पर्धा,चित्रकला ,वक्तृत्व ,कबड्डी, नृत्य स्पर्धा. तसेच विज्ञान
प्रदर्शनात सहभाग ,तसेच दरवर्षी स्काऊट -गाईड शिबिरे आयोजित केले जातात.


शालेय सामने :
शालेय सामन्यांमध्ये कबड्डी , खो-खो , धावणे, गोळा फेक, उंच उडी, चमचा- लिंबू ,या सामन्यांचा समावेश.